खेडमध्ये २५ गावे, ३० वाड्यांना पाणीटंचाईचा धोका


तालुक्यात पावसाने दिलेली ओढ आणि भूजल पातळीत झालेल्या प्रचंड घसरणीमुळे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तालुक्याला ’ट्रिगल-२’ अंतर्गत दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. उन्हाळा सुरू होताच २५ गावे आणि ३० वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा तीव्र धोका निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थ आतापासूनच कमालीचे हतबल झाले आहेत.
पावसाअभावी नद्या, नाल्या आणि स्थानिक विहिरीतील पाण्यामध्ये कमालीची घट होत आहे. यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात २५ गावे व ३०हून अधिक वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास गावांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अह्यालानुसार तालुक्यातील डोंगराळ भागातील निरीक्षण विहिरींमधील पाणी पातळी ३.५ ते ४.५ मीटरने खालवली आहे. तालुक्यातील लघुपाटबंधारे आणि पाझर तलावांमधील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत ७६ टक्क्यांवर आला आहे. भूजलाचा अमर्याद उपसा आणि पावसाची घट यामुळे ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. संभाव्य पाणीटंचाई गावांमध्ये शासकीय व खासगी टँकरने मोफत पाणीपुरवठा नियोजन अंतिम टप्प्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button