शासकीय मुलींच्या आयटीआयमध्ये ‘डिजिटल मित्र’ मोफत अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; १० वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी


रत्नागिरी, दि. २२ ): येथील राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), (आयटीआय) येथे ‘डिजिटल मित्र’ या अल्पमुदत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि. २१ ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डिजिटल युगातील रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

  • किमान शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण.
  • अभ्यासक्रमाचा कालावधी: ३ महिने (अल्पमुदत).
  • प्रशिक्षण शुल्क: संपूर्ण अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत.
  • प्रमाणपत्र: प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVT) यांचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.
    नोंदणी व अर्ज प्रक्रिया
    इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी https://msbsvet.edu.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.
    संपर्क क्रमांक:
    प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील शिल्पनिदेशकांशी संपर्क साधावा किंवा राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), रत्नागिरी येथे थेट भेट द्यावी:
    *एम. एम. दळी (FVP) : ९९७०४३२७४२
    *ए. ए. दाभोळकर : ७३८७४१६९५८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button