राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ बाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. DRCHO डॉ. ठाकूर, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काठोळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे महत्त्व, मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य विभागाची जबाबदारी तसेच मोहिमेच्या यशस्वितेसाठी आवश्यक असलेल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालक व किशोरवयीन मुला-मुलींमधील जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करणे, त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे आणि मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका तसेच गटप्रवर्तक उपस्थित होते.

राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button