जमीर खलफे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर


गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देणारे रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे.
जमीर खलफे हे पत्रकार असून त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे, रत्नागिरी येथे सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे ते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष असून या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात,सैतवडे एज्युकेशन सोसायटी चे ते सक्रिय सभासद आहेत, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी चे ते सचिव असून ही महत्त्वाची जबाबदारी ते अतिशय प्रभावीपणे राबवित आहेत,त्यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अनेक स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सदर पुरस्कार सोहळा 22 नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button