ग्राहक पंचायतीने केली सणासुदीच्या काळात रास्त दराने साखर,तेल, मैदा उपलब्ध करून देण्याची मागणी!

सध्या दिवाळी आणि इतर सणांचे दिवस सुरू झाले आहेत. सध्या भविष्यात येणाऱ्या दुष्काळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान बाजारपेठेत सण साजरा करण्यासारख्या वस्तूंचे दर मागील महिन्यांच्या तुलनेने खूपच जास्त प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोकणातील जनता तेल, मैदा, रवा, बेसन आणि अन्य वस्तुंसाठी पूर्णपणे परावलंबी आहे. या मुळे या वस्तू बाजारातून विकत आणण्यासाठी कोणताही पर्याय ग्राहकांकडे नाही. यामुळे या वस्तूंच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत शासनाकडून रास्त धान्य दुकानात साखर, रवा, बेसन, मैदा अशा वस्तू पुरेश्या प्रमाणात रास्त दराने उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.

या साठी शासनाने ग्राहकांना खाजगी व्यावसायिकांकडून चढ्या दराने वस्तू घ्याव्या लागू नयेत या साठी शासन स्तरावर योग्य पद्धतीने तजवीज करून रास्त धान्य दुकानात रास्त दराने सणांसाठी आवश्यक किराणा सामान उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
या वेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन, खजिनदार अनंत भडकमकर आदी उपस्थित होते.
ग्राहक पंचायत सातत्याने ग्राहकांच्या हिताचे विषय मांडत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button