CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांची तिहार जेलमधून ‘या’ अटीवर सुटका


जंतर-मंतर येथील आंदोलनासाठी बंदी घातलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची बुधवारी सात दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या कोठडी वाढवण्याच्या मागणीनंतरही विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांची सुटका करण्याचे आदेश बुधवारी दिले. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी वर्षभर ‘शांतता आणि चांगले वर्तन’ राखण्याच्या बंधपत्रावर स्वाक्षरी केली होती. मात्र, १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी जंतर-मंतर येथे जाऊन तिरंगा फडकवला. शांतता बंधपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कोणत्या अटींवर दोघांना जामीन मिळाला?

जंतर-मंतरवर यापुढे कोणत्याही आंदोलनाची हाक देणार नाही, अशी लिखित हमी दिल्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांची बुधवारी संध्याकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही नेत्यांना ५० हजार रुपयांचा वैयक्तिक रोख्यावर आणि जामीन भरण्याचे निर्देश देत शांतता राखण्याच्या अटीवर मुक्त केले.

. तसेच, भविष्यात कोणतेही आंदोलन झाल्यास ते पूर्णपणे भारतीय संविधानाच्या चौकटीतच केले जाईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button