साकीनाका हादरलं ! एकापाठोपाठ 5 सिलिंडरचे कानठळ्या बसवणारे स्फोट


मुंबईतील वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या साकीनाका परिसरातील पाइपलाइन भागात आज अचानक एका भयंकर दुर्घटनेने हाहाकार उडवून दिला.नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या दैनंदिन गडबडीत अचानक आगीच्या महाभयंकर ज्वाळा उसळल्या आणि संपूर्ण परिसरात क्षणात घबराट पसरली.आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की, बघता बघता आकाशात काळ्याकुट्ट धुराचे प्रचंड लोट पसरले आणि अवघा परिसर धुराच्या साम्राज्यात हरवून गेला.

स्थानिक नागरिक काही समजून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच, कानठळ्या बसवणाऱ्या एकापाठोपाठ एक ४ ते ५ गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरवून सोडला. या भीषण स्फोटांच्या आवाजाने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि लोकांनी सुरक्षिततेसाठी सैरावैरा धाव घेतली. आग नेमकी कशामुळे भडकली आणि सिलिंडरचे स्फोट कशामुळे झाले, याचे गूढ अद्याप कायम आहे
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आगीच्या ज्वाळा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाढती गर्दी बाजूला सारून परिस्थितीवर ताबा मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button