ग्वाल्हेरमधील शीतला माता मंदिराजवळभीषण अपघात, भाविकांच्या अंगावरून ट्रक गेला; १२ ठार, ४० जण जखमी


मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज (दि. १८) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर एक अनियंत्रित भरधाव ट्रक जाऊन धडकल्याने १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

धान्याने भरलेला हा ट्रक पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून थेट मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आणि गेटवर आदळला, ज्यामुळे हा मोठा अनर्थ घडला.

नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास छिनोर बाजूकडून खाली उतरणाऱ्या रस्त्यावर घडली. या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. अपघातानंतर एकूण ३९ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला. ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button