
चिपळूणमध्ये अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार आगमन
रात्री आठ वाजता पावसाच्या सरी; शेतकरी सुखावले, रत्नागिरीसह अन्य तालुक्यांना प्रतीक्षा
चिपळूण : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिपळूण परिसरात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दीर्घकाळ पाऊस नसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारवा अनुभवता आला. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, चिपळूण परिसरात पावसाला सुरुवात झाली असली, तरी रत्नागिरी, संगमेश्वर आणि जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे या भागांतील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.




