चिपळूण शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर

संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी

चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या चिपळूण शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण शहर मंडळाचे अध्यक्ष मकरंद (आशिष) चंद्रकांत खातू यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे त्यांना नियुक्तीची माहिती दिली.

चिपळूण शहरातील महिला मोर्चाची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि केंद्र व प्रदेश कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अशी जबाबदारी रुही खेडेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे कराल, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

या नियुक्तीपत्राची प्रत दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनाही पाठविण्यात आली आहे.

रुही खेडेकर यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण शहरातील भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button