नातूनगर मोहल्ला येथे कंटेनर पलटी; मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही लेन बंद


अपघातात २८ वर्षीय चालक जखमी; नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल


खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथे शनिवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही लेनवरील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे बंद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक MH 46 CE 2228 हा मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना नातूनगर मोहल्ला येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथील पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २४ तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेद्वारे जखमी दीपक मुरलीधर पाल (वय २८, रा. न्हावाशेवा, मुंबई) यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य केले. कंटेनर पलटी झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, दोन्ही लेन बंद झाल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button