दापोलीत अतिक्रमणाच्या नियमांमुळे माणुसकी हरवली? वृध्द विधवा वृत्तपत्र विक्रेत्या महिलेच्या टेबललाही मनाई


दापोलीः- गेली तीस वर्षे दापोली एसटी स्टॅण्डच्या बाहेर टेबल उभारून वृत्तपत्र विक्री करत आपला उदरनिर्वाह चालवणाNया एका वृध्द विधवा महिलेला वृत्तपत्र विक्रीसाठी टेबल लावण्यास मनाई केल्याची बाब समोर आली असून दिवसाला अवघे 100 ते 150 रूपये कमावणाऱ्या या महिलेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे. याप्रकरणी दापोली तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, जिल्हाधिकारी तसेच राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेला निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील अतिक्रमणे हटवणे, रस्ते मोकळे ठेवणे आणि वाहतुकीला अडथळा येऊ न देणे ही नगरपंचायतीची जबाबदारी असून या भूमिकेतून नुकतीच नगरपंचायतीच्या वतीने शहरातील ठराविक भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ही अतिक्रमणे हटविताना दापोली एसटी स्टॅण्ड परिसरातील वृत्तपत्र विक्रीचा स्टॉलही त्या कचाटयात अडकला. आतापर्यंत दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात विविध मुख्याधिकारी झाले मात्र त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा अधिकार कायम ठेवत आपली कारवाई केली असल्याचे दिसून येत आहे.
दापोली नगरपंचायतीने केलेल्या कारवाईचे स्वागत सर्वत्र होत असले तरी 66 वर्षाय स्वतंत्र जीवन जगणाऱ्या व स्वकष्टावर अर्थाजन करणाऱ्या वृध्द महिलेच्या परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार होणार की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचा फोन क्रमांक देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने याबाबत प्रशासनाची बाजू समजू शकलेली नाही.
फोटो डिपी 08-04 दापोली एसटी स्टॅण्ड परिसरात वृत्त पत्र विक्री करणाऱ्या वृध्द विधवा महिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button