
तेव्हाच आंदोलन थांबणार’, हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7 वा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय व्हावा, असं म्हटलं आहे.विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि घरी जाऊन अभ्यासाला लागावे, असा सल्ला न्यायालयाने दिला. मात्र, या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार रोहित पवार यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हा आंदोलन थांबणार, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी जे नीटचं आंदोलन झालं होतं तेव्हा केंद्रीय मंत्र्यांना घरी जावं लागलं होतं. त्यामुळं आज भीमनवारांना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मित्राला घरी पाठवलं नाही. तर मग मात्र राज्य सरकारमध्ये मोठा घोळ होऊ शकतो. कारण ही विद्यार्थ्यांची ताकद आहे. आज महाज्योतीमध्ये जो घोळ झाला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचीही मागणी आहे की अतुल सावेंना घरी पाठवा. तो निर्णय तर सरकारच्या हातात आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.




