आमदार भास्कर जाधव यांच्या आक्रमक रुपाने सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी  


जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या आक्रमक रुपाने सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली. बैठकीत उपस्थित विरोधी पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या भास्कर जाधवांनी निधी वाटपातील उघड पक्षपात, आठ-आठ महिने बैठका न घेण्याचा निष्काळजीपणा आणि प्रशासकीय मनमानीवर थेट बोट ठेवत सत्ताधार्‍यांना चांगलाच घाम फोडला, भक्कम पुरावे आणि अचूक आकडेवारीनिशी त्यांनी केलेल्या या तडाखेबंद हल्ल्यामुळे डीपीसी ची बैठक सत्ताधार्‍यांसाठी अक्षरशः आत्मपरीक्षणाची ठरली.
’जिल्हा नियोजन’च्या सोमवारी झालेल्या बैठकीचा प्रारंभहोताच आमदार भास्कर जाधवांनी निधी वाटपातील राजकीय दुजाभावाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार हल्ला चढवला. त्याबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गुहागर मतदारसंघात लोकप्रतिनिधी किंवा सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तींच्या पत्रावर विद्यमान आमदारांपेक्षा चारपट जास्त निधी मंजूर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. दुसर्‍या मतदारसंघातील व्यक्तींनी सुचवलेल्या कामांना नियोजन मंडळ डोळे झाकून मंजुरी देत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. एका माजी आमदाराच्या शिफारशीवर कोट्यवधींचा निधी उधळला जात असल्याने संतापलेल्या जाधवानी एकाच माजी औपदाराच्या पत्रावर जर तुम्ही निधी घाटणार असाल तर जिल्ह्यातील सर्वच माजी आमदारांच्या पत्रांवर निधी द्या अशी मागणी त्यांनी केली. जाधव यांच्या या अनपेक्षित आणि थेट प्रहारामुळे पालकमंत्री उदय सामंत यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आणि यापुढे असे चुकीचे व अन्यायकारक निर्णय होणार नाहीत, असे पालकमंत्री सामंत यांना सभागृहात सांगावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button