खेड तालुक्यात गेल्या दीड वर्षात विंचूदंशाच्या ५९६ घटना घडल्याची नोंद


खेड तालुक्यात गेल्या दीड वर्षात विंचूदंशाच्या ५९६ घटना घडल्याची नोंद तालुका आरोग्य विभागाकडे झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ विंचूदंशाच्या समस्येने त्रस्त आहेत. सर्वाधिक घटना शेतात काम करताना तसेच रात्रीच्या वेळी घरात घडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
तालुक्यातील लोटे, भरणे, फुरुस, खोपी, कशेडी, खोपी-तांबडवाडी, लवेल, आंबवली यासारख्या ग्रामीण व दुर्गम गावांमध्ये विंचूदंशाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. सर्व बाधितांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासह त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. सुदैवाने आरोग्य यंत्रणेच्या वेळेवर मिळालेल्या उपचार व औषधांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button