दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ बोर्डाच्या 621 गुंठे जमीनीवर इमारती, बंगले, 44 जणांना नोटीस,

दापोली शहरातील उदयनगर परिसरातील वक्फ बोर्डाच्या तब्बल 621 गुंठे जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या जमिनीची परस्पर विक्री करून त्यावर इमारती आणि बंगले उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने संबंधित व्यक्तींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.

ही जमीन काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, या जमिनीचा वक्फ पूर्वीपासून अस्तित्वात असून सुमारे 1897 पासून या मालमत्तेचा वक्फशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर या जमिनीच्या मालकी व हस्तांतरणासंदर्भात विविध व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

180 आणि 441 गुंठ्यांचे व्यवहार?

माजी स्वीकृत नगरसेवक संजय सावंत यांनी या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, 621 गुंठ्यांच्या जमिनीचे दोन स्वतंत्र खरेदीखतांद्वारे 180 गुंठे आणि 441 गुंठे, अशा स्वरूपात व्यवहार झाल्याचे कागदपत्रांमधून दिसून येते. या व्यवहारात बिल्डर व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा संबंध असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

या प्रकरणात वक्फ मंडळाची आवश्यक परवानगी न घेता जमीन विक्री अथवा हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button