क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात


भारतीय क्रिकेट संघाचे माजी धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक नवा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून तो पाहून क्रीडाप्रेमींमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या व्हिडिओमध्ये कांबळी ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या एका वृद्धाश्रमात वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या या मातब्बर खेळाडूची ही सद्यस्थिती पाहून चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओत स्वतः विनोद कांबळी मात्र त्या आश्रमातील व्यवस्था आणि तिथल्या प्रेमळ वातावरणाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

वृद्धाश्रमातील व्यवस्थेचे कांबळींकडून कौतुक

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कांबळींनी आश्रमातील अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. ते म्हणाले की, सध्या मी ‘निदान’ या केअर सेंटरमध्ये राहत असून येथील सोयी-सुविधा अत्यंत दर्जेदार आहेत. आश्रमातील व्यवस्थेची प्रशंसा करताना त्यांनी सांगितले की, येथील स्वच्छता, काळजी घेण्याची पद्धत आणि इतर सर्व बाबी अगदी उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. येथे राहत असताना मला आपण आपल्या घरापासून दूर आहोत, असा जराही भास होत नाही. येथील सर्व कर्मचाऱ्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून मला भरभरून प्रेम व आदर मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button