नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम कोल्हापूर जिल्ह्यात रेंगाळले


नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कोल्हापूर जिल्ह्यात वेग आला आहे. आंबा ते शिये फाटा दरम्यानचे काम सध्या गतीने सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्च २०२७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.मात्र, शिये फाटा ते सांगली या मार्गासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती तसेच भूसंपादनातील अडचणी सोडविण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाबाबत सध्या स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर ते रत्नागिरीदरम्यानचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. यामध्ये मिऱ्या बंदर ते आंबा, आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यांचा समावेश आहे. मिऱ्या बंदर ते आंबा या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडी टप्प्यातील सुमारे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर पैजारवाडी ते चोकाक टप्प्यात सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.पैजारवाडी ते चोकाक टप्प्याचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आंबा ते शिये फाटा या भागातील उर्वरित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे घाटात धोकादायक वळणे आहेत. या वळणांना कायमस्वरूपी पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच आणि लांब उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी सध्या दिवसरात्र काम सुरू असून, ६०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button