सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रीय पोषण माह’ निमित्त किशोरवयीन मुली व गर्भवती मातांसाठी विशेष आरोग्य शिबीर

रत्नागिरी, दि, २४ ): “सेवा संकल्प अभियान” तसेच “राष्ट्रीय पोषण माह” या उपक्रमांचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यात किशोरवयीन मुली व गर्भवती मातांसाठी तालुकास्तरीय विशेष आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण आणि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
तालुक्यातील अनेक गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टर पाटील मॅडम यांनी उपस्थित महिला व मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली. यात प्रामुख्याने रक्तातील हिमोग्लोबिन (Hb), वजन, उंची आणि दैनंदिन आरोग्याची सविस्तर तपासणी करण्यात आली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिकारी केदार चव्हाण आणि संदीप पाटील यांनी आहारातील पोषणाचे महत्त्व अधोरेखित केले. कुपोषण निर्मूलन आणि ॲनिमियासारख्या आजारांवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक अन्नधान्यांचा, पालेभाज्यांचा आणि फळांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गर्भवती मातांनी गरोदरपणातील काळजी व नियमित औषधोपचार वेळेवर घ्यावेत आणि किशोरवयीन मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व सकस आहाराबाबत विशेष दक्षता बाळगावी, याविषयी सविस्तर समुपदेशन करण्यात आले.
या कार्यक्रमास पटवर्धन हायस्कुलच्या मुख्याध्यापिका, रत्नागिरी प्रकल्पातील सर्व सुपरवायझर तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button