भडगाव- खोंडे येथे कचऱ्याची समस्या गंभीर; घंटागाडी नियमित नसल्याने नागरिक त्रस्त

कचरा साचल्याने दुर्गंधी; ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खेड : तालुक्यातील भडगाव- खोंडे परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. परिसरात नामांकित महाविद्यालय तसेच मोठी लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतानाही तो नियमितपणे उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भडगाव- खोंडे ग्रामपंचायतीची घंटागाडी नियमितपणे परिसरात येत नसल्याने अनेक दिवसांपासून कचरा एकाच ठिकाणी साचून राहत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात मोठी लोकवस्ती आणि महाविद्यालये असल्याने स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन घंटागाडी नियमित सुरू करावी तसेच साचलेला कचरा त्वरित उचलावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button