बोरघरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून रोकड चोरी

अज्ञात चोरट्याचा घरात प्रवेश; लोखंडी कपाट व लॉकर उघडून ५ हजारांची रोकड लंपास

खेड : तालुक्यातील बोरघर- राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाट व लॉकरमधील ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिस नोंदीनुसार, ही घरफोडी दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. फिर्यादी सुधीर सिताराम पवार (वय ५०, व्यवसाय वकील, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई; सध्या मुक्काम खेड) हे घरात नसताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुमजली घराच्या सेफ्टी दरवाजाला तसेच आतील दरवाजाला लावलेले दोन्ही लॉक अज्ञात हत्याराच्या साहाय्याने उचकटले.
त्यानंतर चोरट्याने घरात अनधिकृत प्रवेश करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच लोखंडी कपाट व त्यातील लॉकर उघडून ५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.४१ वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३११/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(२), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button