महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते,माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन


महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मावळ तालुक्याचे सुपुत्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे सोमवारी (दि. १४) वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ॲड. मदन बाफना यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभावी राहिली.

१९६७ मध्ये एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीबरोबरच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. पुढे ही मैत्री राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ सहकार्यामध्ये रूपांतरित झाली. बाफना यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. त्यांनी मावळ तालुका काँग्रेस कमिटी तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९७७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले.

मावळचे दोनदा आमदार, दोनदा मंत्री

मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५ आणि १९९० मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. अशा प्रकारे त्यांनी मावळचे दोनदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदारकीच्या काळात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी महसूल राज्यमंत्री तसेच परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी जमीनविषयक प्रश्न आणि महसूल प्रशासनाशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष दिले. मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button