
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या कारला नांदगाव येथे भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चौघे जखमी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली;
गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटवफाटा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-बदलापूर येथून आचरा-अडवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दिशेने कारमधून पाच जण प्रवास करत होते. नांदगाव ओटवफाटा येथे कार आली असता चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव कार दुभाजकावर जोरदार आदळली.
या अपघातात कारमधील आनंद दादू लाड (वय अंदाजे ७०, रा. नालासोपारा, मुंबई) यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर कारमधील अन्य चार प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




