दिवा-मुंब्रादरम्यान गर्दीच्या रेट्याने लोकलमधून पडली महिला; सिग्नलमुळे लोकल जागीच उभी असल्याने अनर्थ टळला


मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवासातील अतिगर्दी आणि तांत्रिक त्रुटी प्रवाशांच्या जिवावर बेतत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पुन्हा एकदा समोर आला.डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यातून ऐन गर्दीच्या वेळी एक महिला रेल्वे रुळांवर पडली. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एका वळणावर सिग्नलमुळे लोकल जागीच उभी असल्याने अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गतवर्षी जून महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ अशाच प्रकारे जलद मार्गावर दोन लोकल एकाच वेळी विरुद्ध दिशांनी जात असताना, लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही मुंब्राजवळील रुळांचे धोकादायक वळण आणि तांत्रिक रचना मोठ्या चर्चेत आली होती. गुरुवारच्या घटनेत केवळ लोकल थांबली असल्याने मोठी जीवितहानी टळली, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button