खेड रेल्वे स्थानकावर रत्नागिरी-वलसाड एक्स्प्रेसची धडक; ६५ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी


खेड रेल्वे स्थानकावर मंगळवारी, सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-वलसाड एक्स्प्रेसची एका प्रवाशाला जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात सखाराम लाड (वय ६५, रा. खोपी) हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी सखाराम लाड यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व संबंधित यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहिती मिळणे बाकी असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button