वाडा-तिवरे समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला नाटे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन


राजापूर : तालुक्यातील वाडा-तिवरे येथील समुद्रकिनारी १ सप्टेंबर २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (एडीआर क्र. २५/२०२६) करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी आढळलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्षे असून, उंची सुमारे ५ फूट ३ इंच ते ५ फूट ५ इंच आणि अंगकाठी मध्यम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नाटे पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे. या वर्णनाशी मिळतीजुळती कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा नाटे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
माहिती देण्यासाठी नाटे पोलीस ठाणे – ९६८४७०८३२२, तपास अधिकारी – ९७६६०५४६१५, तसेच रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष – ०२३५२-२२२२२२ / २७१२५७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button