
नवी मुंबईहून श्रीनगर विमानतळावर पोहचलेल्या इंडिगोच्या विमानाचा अपघात, पार्किंगमधल्या पोलला धडक
मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावनर एक अपघात घडला. शुक्रवारी सकाळी 9 वाजता विमान पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडला. प्रवासी आणि कॅबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी 9 वाजता ही अपघाताची घटना घडली. धावपट्टीजवळील व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिमला विमानानं धडक दिली. या घटनेची माहिती घेण्यात येत आहे. हा अपघात कशामुळे घडला याचं कारण समोर आलेले नाहीविमान क्रमांक 6E 225, VT-NOG चा अपघात घडला. सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. कुणालाही दुखापत झाली नाही. नवी मुंबईहून हे विमान श्रीनगरला पोहोचले होते. त्याचवेळी पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडला.




