
सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा; २४ वाहनचालकांना पोलिसांचा दणका
जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई; वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर गुन्हे
रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २४ वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी विजय यशवंत पवार (४७, रा. कोकजेवठार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच मार्गावर रिक्षा उभी केल्याप्रकरणी विजय यशवंत रेवाळे (४२, रा. भोके), तसेच सचिन प्रदीप साळुंखे (४६, रा. खेडशी) आणि रंजीत रघुनाथ लवंदे (४२, रा. आगरनरळ-भोईवाडी) यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी स्टँड परिसरात दुचाकी उभी केल्याप्रकरणी गौरव हेमंत आग्रे (२४, रा. रावरी) याच्यावर, तर त्याच परिसरात चारचाकी उभी केल्याप्रकरणी कल्पेश अरुण राणे (३६, रा. बोरथडे-मधलीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व्हिस सेंटरसमोर दुचाकी उभी केल्याप्रकरणी अल्ताफ मुराद ठाकूर (४२, रा. अंजणारी-मुस्लिमवाडी), जावडे फाटा येथील बिअर शॉपीसमोर चारचाकी उभी केल्याप्रकरणी निखिल अनंत लिंगायत (३०, रा. वाडीलिंबू-मोहितेवाडी) आणि सोनाई हॉस्पिटलसमोर दुचाकी उभी केल्याप्रकरणी योगेश किशोर पांचाळ (४३, रा. सुतारवाडी, लांजा) यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळी बुद्रुक येथील हॉटेलसमोर गुहागर-विजापूर राज्य महामार्गावर अवजड वाहने उभी केल्याप्रकरणी कर्नाटकातील सरदार लालू चव्हाण (३४) आणि अमेश लक्ष्मण राठोड (२५) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. बहादूरशेख नाका येथील चिपळूण-कराड मार्गावर टाटा मॅजिक वाहन उभे केल्याप्रकरणी संतोष परशुराम शिंदे (४८, रा. कोळकेवाडी-पायरवाडी) याच्यावरही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरात तेलीआळी नाका, आठवडा बाजार, जेलनाका ते भगवती मंदिर मार्ग, जयस्तंभ आणि नगर वाचनालय परिसरातही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये अरविंद केशव शिंदे (४२), आदिल इकबाल बहुये (४७), अक्षय मोहन राऊत (३२) आणि रविकांत देवानंद कडपट्टे (३३) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मारुती मंदिर परिसरात वाहन उभे केल्याप्रकरणी सागर सुभाष बंदरकर (४८) याच्यावरही कारवाई करण्यात आली.
जयगड रस्त्यावरील खंडाळा येथे बोलेरो वाहन उभे केल्याप्रकरणी मानाजी सदाशिव चव्हाण (५३, रा. सदाशिवनगर, करवीर, कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजापूरमध्ये सोल्ये ते राजापूर रेल्वे स्थानक परिसरातील नो-पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्याप्रकरणी ईस्माईल जाफर नाईक (६५, रा. हसोळ-मुस्लिमवाडी) याच्यावर कारवाई करण्यात आली. खेडमध्ये नगर परिषदेसमोर खेड-दापोली मार्गावर दुचाकी उभी केल्याप्रकरणी क्षितीज संजय दरेकर (३०, रा. आठवडा बाजार, भरणे नाका) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमेश्वर बाजारपेठेत टेम्पो उभा केल्याप्रकरणी नीलेश नामदेव चव्हाण (४०, रा. कोळंबे-चव्हाणवाडी), संगमेश्वर-देवरुख मार्गावर पिकअप वाहन उभे केल्याप्रकरणी अय्य सरदार कतनळी (५०, रा. संगमेश्वर) आणि कार उभी केल्याप्रकरणी दिनेश मधुकर कांचले (३४, रा. शाहुवाडी, मलकापूर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




