हातखंबा येथील ’स्टेट बँक ऑफ इंडिया’चे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न


रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या हातखंबा येथील ’स्टेट बँक ऑफ इंडिया’चे एटीएम मशीन चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.५३ वाजेच्या सुमारास घडली. हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये असलेले एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापक शितल रमाकांत शिंदे (४५) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button