
रत्नागिरी -कोल्हापूर मार्गावर आंबा घाटाच्या दुरुस्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या महत्त्वाच्या आंबा घाटातील वाहतूक लवकरच सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटातील दरड कोसळलेल्या आणि रस्ता खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम आगामी आठवडाभरात प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहे. माती परीक्षण आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या कामाचा अनुभव असलेल्या ’मेकॅथेरी’ या कंपनीकडे दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होताच दुरुस्तीच्या कामाला वेग येणार आहे.
आंबा घाटातील रस्ता खचल्याने गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. घाटातील बाधित भागाची पाहणी त्याठिकाणी मातीचे नमुने करून घेण्यात आले होते. तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या तांत्रिक चाचण्यांनंतर या भागातील भूस्तराची स्थिती स्पष्ट झाली आहे.
या विशेष म्हणजे, दुरुस्तीच्या कामात आधुनिक तत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ’एअर डोम’ पद्धतीचा त्यामध्ये समावेश आहे. छत्रीच्या आकारासारखी ही रचना खचलेल्या भागात पावसाचे पाणी मुरण्यापासून रोखण्यास मदत करणार आहे. पावसाचे पाणी संबंधित भागात साचण्याऐवजी किंवा जमिनीत मुरण्याऐवजी थेट दरीच्या दिशेने वाहून जाईल, अशी या रचनेची मातीचा थर कमजोर होऊन संकल्पना आहे. त्यामुळे पुन्हा रस्ता खचणे किंवा दरड कोसळण्याचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे.




