नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूरामुळे शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता; अनेकांचा मृत्यू!


नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून ४१ सुरक्षा कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

बेपत्ता कर्मचाऱ्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे ३२ आणि सशस्त्र पोलिस दलाचे ९ जवान आहेत. त्याचबरोबर २९१ परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे.

भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिबेट सीमेजवळील तिमुरे आणि स्याफ्रु बेसी परिसराला मोठा फटका बसला. पुराच्या वेगवान प्रवाहात अनेक वाहने आणि स्थानिक भाग वाहून गेले. रस्ते आणि पूल तसेच जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेमुळे किती नुकसान झाले आहे याचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२९१ परदेशी नागरिक बेपत्ता

नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, पुरामुळे २९१ परदेशी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी किमान १०५ भारतीय पर्यटक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून, पुरामुळे बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button