
राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर
*रत्नागिरी, दि.26 (: राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता भेटीसाठी राखीव. (स्थळ : पाली कार्यालय, पाली) सकाळी 10.30 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कुंवारबाव, रत्नागिरी येथे भेट. सकाळी 11 वाजता अरिहंत प्राईम अपार्टमेंट येथे भेट व पाहणी (स्थळ : अरिहंत प्राईम अपार्टमेंट, रत्नागिरी) सकाळी 11.30 वाजता अॅड. श्री. महेंद्र मांडवकर, जि.प.सदस्य यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट (स्थळ : जावकर प्लाझा, जयस्तंभ) सकाळी 12 वाजता शासकीय विभागीय ग्रंथालय आढावा बैठक (स्थळ : शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर) दुपारी 12.30 वाजता मौजे मालगुंड येथील प्रस्तावित प्राणिसंग्रहालय विकसित करणेबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 1.30 वाजता सायबर गुन्हे संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 2.30 वाजता गणपतीपुळे विकास आराखडा आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 3.30 वाजता भाट्ये बीच सुशोभिकरणबाबत सादरीकरण (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 4.15 वाजता कै. प्रकाश आंबेकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट (स्थळ : फणसवळे, रत्नागिरी) सायंकाळी 5 ते 7 वाजता राखीव (स्थळ : जनसंपर्क कार्यालय, जयस्तंभ) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ 11.30 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.




