आश्‍वासन दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांचे उपोषण कारवाईच्या आश्वासनानंतर मागे


गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या संध्या कोसुंबकर यांच्या बेमुदत उपोषणाची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दखल घेतली. संबंधित पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोसुंबकर यांनी उपोषण मागे घेतले आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत लेखी पत्र दिले.
कोसुंबकर ऑगस्टपासून राकेश जंगम प्रकरणात जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी कुलदीप पाटील या १५ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसल्या होत्या. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना हे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात होते. यावेळी संध्या कोसुंबकर यांच्या सहकारी महिलांनी पोलीस मुख्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. महिलांनी उपोषणाची पार्श्वभूमी, मृत राकेश जंगम प्रकरणातील आरोप आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या याबाबत मीना यांना माहिती दिली. या भेटीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button