
कोल्हापूर जिल्ह्यात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई; कोट्यवधीचा साठा जप्त!
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे एमडी ड्रग्स या अमली पदार्थ विक्री बनवणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, पुणे पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सुमारे ५० किलो ड्रॅग जप्त करण्यात आल्याची माहिती असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण आणि कर्नाटक ,गोवा या सीमावर्ती भागात हा ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. कारवाई दरम्यान ड्रॅग तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत.
सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध ड्रग्स निर्मितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कारखान्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे.
कारखान्यातून ड्रॅग निर्मितीसाठी वापरले जात असलेले विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन आणि मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकृतपणे संबंधित विभागाकडून माहिती मिळणे अपेक्षित आहे.




