मालगुंड येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण उत्साहात संपन्न


मा. ना.प्रकाश आबिटकर मंत्री आरोग्य व प्रधान सचिव मा. डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण (Comprehensive Primary Health Care – CPHC) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक स्तरावर नागरिकांना सर्वंकष आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध १३ आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गर्भधारणा, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी, नवजात शिशू व अर्भक आरोग्य सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, डोळे व कानांच्या समस्या, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळातील आरोग्य सेवा, तात्कालिक वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य तसेच योग व आयुष उपचार पद्धती यांचा समावेश होता.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश साळवी, पंचायत समिती सदस्य सौ. पूर्वा दुर्गवळी, सरपंच सौ. श्वेता खेऊर, डॉ. शरण काठोळे, डॉ. सुनीता पवार, डॉ. नगमा गलबले, मुख्याध्यापक श्री. बिपीन परकर, श्री. प्रमोद लिंगायत, श्रीमती वीणा शिरगांवकर, श्रीमती साधना झोरे तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य पातळीवर नागरिकांना अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य मिळाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ शितल सूर्यवंशी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक तसेच आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button