
दापोली भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘सेवा अभियान’ संपन्न

दापोली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे, भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दापोली येथे भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आज ‘सेवा अभियान’ संपन्न झाला.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, आणि त्या अडचणी राज्य शासनापर्यंत पोहोचाव्यात, याच उदात्त हेतूने हा ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आला होता. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच उद्दिष्ट आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न होता. यापुढेही असे उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.
याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम भाऊ इदाते, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, भाजपा ग्रामविकास व पंचायत राज सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, शशांक सिनकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी तसेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




