चिपळुणात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त व्याख्यानमाला

२९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान विविध विषयांवर मान्यवरांचे व्याख्यान

चिपळूण : श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, चिपळूण यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त यंदाही ‘श्रीकृष्ण व्याख्यानमाला २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते गुरुवार, दि. ३ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, चिपळूण येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी देवगड शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री. सदानंद भागवत यांच्या ‘बदलती शिक्षणव्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी संस्कृत तज्ज्ञ, चित्रकार तथा उपजिल्हाधिकारी सौ. आसावरी संसारे-खेडकर ‘महाकवी कालिदास आणि निसर्ग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी पुणे येथील संरक्षण तज्ज्ञ श्री. काशिनाथ देवधर यांचे ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत’ या विषयावर व्याख्यान होईल.

मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील दैनिक लोकसत्ताचे नामवंत चित्रकार श्री. निलेश जाधव ‘केल्याने खेळात’ या विषयावर संवाद साधणार आहेत. बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा समितीच्या उपाध्यक्षा अॅड. रुची महाजन ‘बदलती कुटुंबव्यवस्था’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

व्याख्यानमालेचा समारोप गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी युवा इतिहास अभ्यासक डॉ. मैत्रेयी करमरकर यांच्या ‘निरंजनातील ज्योती’ (स्वा. सावरकरांच्या पत्नी व भावजयांची चरित्रे) या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या वैचारिक मेजवानीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीनारायण देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button