
‘जुनिअर बॉयज मित्रमंडळ साळगाव’ पुरस्कृत “स्वातंत्रदिन विशेष स्पर्धा” शाळा साळगाव नं १ मध्ये संपन्न


देशाच्या ८० व्या स्वातंत्रदिन चे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी शाळा साळगाव नं १ मर्यादित विविध स्पर्धा पार पडल्या. श्री. मकरंद साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी कु. स्वरा तावडे हिच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ‘जुनिअर बॉईज मित्रमंडळ साळगाव’ पुरस्कृत, ‘साळगाव ची आडसारा’ आयोजित ‘स्वातंत्र्यदिन विशेष स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे.


वेशभूषा (गट अंगणवाडी)
प्रथम – हर्षित सत्यवान चव्हाण, द्वितीय – मोहिता मनोहर गवस, तृतीय विभागून – शशांक बाबाजी सावंत, शुभ्रा प्रसाद सावंत
रंगभरण (गट पहिली दुसरी )
प्रथम – गीतांजली मदन सावंत, द्वितीय – आदर्श गीतेश परब, तृतीय विभागून – रिया बापू चव्हाण, समृद्धी समीर अवसरे
वक्तृत्व (गट तिसरी चौथी )
प्रथम – देविका श्यामसुंदर लाड, द्वितीय – दर्शना रवींद्र बावदाणे, तृतीय – निखिल हर्षल मेस्त्री
निबंध (गट पाचवी ते सातवी )
प्रथम – स्वरा सत्यवान तावडे, द्वितीय – रुची बाबाजी सावंत, तृतीय – वेदिका गुरुनाथ गावडे.
विजेत्यांना ‘ज्युनिअर बॉयज मित्रमंडळ साळगाव पुरस्कृत भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन तुषार जाधव यांनी केले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. कविता पालव, सौ, प्राजक्ता कन्याळकर, सौ. स्मिता अवसरे, प्रज्ञा परब यांनी मुलांना मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका सौ. नीला भिसे, मदतनीस सौ. सपना साळगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गुरुनाथ गावडे, उपाध्यक्ष श्री. बाबाजी सावंत उपस्थित होते. या स्पर्धे साठी विकास सावंत, विश्वजीत केसरकर, मकरंद साळगावकर, राजेश कारेकर, निलेश पवार, प्रथम सावंत, सत्यवान चव्हाण, अक्षय कारेकर, वामन गुरव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास डॉ. श्रीधर मेस्त्री, श्री. गजानन पवार, सिद्धी मेस्त्री, ग्रामस्थ, पालक, महिला वर्ग, माजी विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन निलेश सावंत यांनी केले.




