
सेवानिवृत्ती म्हणजे टॅक्सपासून मुक्ती नव्हे! पगार नसला तरी कर भरावे लागतेच, रिटायर होण्याअगोदर जाणून घ्या महत्वाची गोष्ट!
जर तुम्हाला वाटत असेल की सेवानिवृत्त झाल्यावर करापासूनही मुक्ती मिळते, तर हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. दरमहा नियमित पगार नसला तरी रिटायर व्यक्तीला कर हा भरावाच लागतो. जिथे उत्पन्न आहे, तिथे कर आहे.
कर फक्त कंपनीला महिनाभर सेवा दिल्यावर मिळणाऱ्या पगारावर नसतो. एखादा व्यक्ती रिटायर झाला तरी त्याचे उत्पन्नाचे इतर पर्याय असू शकतात की! त्यामुळे त्या प्रत्येक उत्पन्नावर कर मोजावे लागणारच.
सेवानिवृत्त व्यक्तींना त्यांच्या नियमित दरमाह पेन्शनवर कर भरावा लागतो. ही पेन्शन Taxable असते. या पेन्शनची मोजणी प्रत्येक महिन्यात मिळणारे वेतन म्हणूनच केली जाते. अनेकदा काही नियमांनुसार, सेवानिवृत्त व्यक्तींना टॅक्समध्ये सूट मिळू शकते. सेवानिवृत्त व्यक्तीला मिळणारे व्याजदेखील करास पात्र आहे. जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे फिक्स डिपोजिट, सेविंग्स खाते किंवा Recurring Deposit असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही कर मोजावे लागते. जर एखादा सेवानिवृत्त कर्मचारी सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा लाभ घेत असेल तर त्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजावरही कर मोजावे लागते. ओल्ड टॅक्स रेजिमे निवडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
अगदी तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली, खरेदी करताना विविध कर भरले तरी पुढे आणखीन कर भरावेच लागतात. जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे एखादी प्रॉपर्टी असेल आणि ती प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल तर त्यातून येणाऱ्या उत्पन्नावरही कर मोजावे लागते. काही नियमांनुसार, या करात 30% पर्यंत सूट मिळते.
शेअर बाजारात ट्रेड करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला करापासून मुक्ती मिळत नसते. जर एखादा शेअर विकला आणि त्यावर नफा असेल तर नफ्यातूनही कर वसूल केला जातो. उदाहरणार्थ., जर तुमच्याकडे 7 लाखांचे शेअर आहेत, त्यात 2 लाखाचा नफा आहे. तर त्या 2 लाखाच्या नफ्यावर कर लागू होतो. फक्त इक्विटि शेअर्सच नव्हे तर म्यूचुअल फंडवरील नफ्यावरही कर आकरला जातो. याला कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणतात. विकली गेलेली मालमत्ता, त्यातून कमवलेला नफा आणि काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करून कर वसूल करण्यात येतो. अगदी एखादी प्रॉपर्टी विकली तर त्यातील नफ्यावरही कॅपिटल गेन्स टॅक्स लागू होतो.
जर एखाद्या सेवानिवृत्त व्यक्तीला एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडून दरमहिन्याला Annuity मिळत असेल तर त्यातून कर आकरण्यात येतो. शेअर बाजारातील शेअर्सवर कंपनीने जारी केलेले डिविडेंड तसेच म्यूचुअल फंडवर मिळणारे डिविडेंड या सगळ्या गोष्टींवर टॅक्स लागू होतो. त्यामुळे सेवानिवृत्त झालो आता दरमाह येणारे वेतन थांबले असा विचार करून टॅक्सपासून मुक्तीचे स्वप्न रेखत असाल तर तसे काहीच नसते. अगदी आयकर विभागाकडून आलेल्या रिटर्नवरही कर आकरला जातो. काही पात्र सेवानिवृत्त जेष्ठ नगिरकांना टीडीएस कापला जाऊ नये म्हणून फॉर्म 15H भरता येतो.




