भाजपात मोठा फेरबदल, नव्या कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील 5 नेत्यांना मोठी संधी!


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या नव्या केंद्रीय पदाधिकारी व विविध विभागांच्या संयोजकांची यादी आज अधिकृतपणे जाहीर केलीभाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात ही नवी कार्यकारिणी काम करेल. आताच्या घोषणेनुसार माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे. मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम असतील.सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील. दुसरीकडे भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचं एका प्रकारे कमबॅक झालं आहे. त्या कार्यकारिणीत सरचिटणीस असतील. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पक्षाच्या राष्ट्रीय अपाध्यक्ष असतील. राजस्थानमधील खासदार सतीश पूनिया हे राष्ट्रीय महासचिव असतील. दरम्यान, आता भाजपाने आपलया कार्यकारिणीत केलेल्या याबदलामुळे आगामी काळात भाजपाला बळ मिळण्याची शक्यता आहे. देशातील सर्वच प्रदेशाला कार्यकारिणीत प्रतिनिधीत्त्व मिळावे, याचा भाजपाने यावेळी प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button