तुळशी खुर्द येथे शेत नांगरणीचे यंत्र चोरीला; १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल

खेड : तालुक्यातील तुळशी खुर्द, दरेकरवाडी येथे शेतात ठेवलेले शेती नांगरणीचे पॉवर वीडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत तुळशी खुर्द येथे घडली. फिर्यादी सुधाकर शंकर दरेकर (वय ६०, व्यवसाय शेती, रा. तुळशी खुर्द, दरेकरवाडी, ता. खेड) यांनी त्यांच्या शेतात शेती नांगरण्यासाठी ठेवलेले VKA 170F Power Weeder 7HP, लाल रंगाचे यंत्र जागेवर नसल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय सदर पॉवर वीडर लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी गु.र. नं. २३०/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button