CJP च्या अभिजीत दिपकेंचा इशारा, “…तर मी पुन्हा आंदोलन करणार”

School principal’s alcoholism, but senior authorities have taken no action : नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन ऑनलाइन सुरु करणाऱ्या अभिजीत दिपकेंनी नंतर ही चळवळ रस्त्यावर आणली. त्यांच्या चळवळीला मोठं यश मिळालं. कारण विद्यार्थी आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपद सोडावं लागलं.

या आंदोलनानंर अभिजीत दिपके चांगलेच चर्चेत आले आहेत. आता अभिजीत दिपकेंनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागांमधील शाळांकडे वळवला आहे. अभिजीत दिपकेंनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अभिजीत दिपकेंची मागणी काय?

हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मद्यपान केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांच्या कथित मद्यपानाच्या सवयीमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच शाळेतील शिक्षकांची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. याबाबत अभिजीत दिपकेंनी व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि इशारा दिला आहे. अभिजीत दिपकेंनी अधिकाऱ्यांना फोन केला होता. ज्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ काय?

जो प्रिन्सिपल आहे तो पिऊन येतो आहे. एक तर असा पिणारा प्रिन्सिपल शाळेत कसा काय येतो? शाळेत लहान लेकरं, लहान मुली असतात. जे तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सांगा की त्या मुख्याध्यापकाला कामावरुन कमी करा. कारण तशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. जर ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण झाली नाही तर गावकऱ्यांसह मी आंदोलनाला बसेन. कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली नाही तर गावकरी आंदोलनाला बसतील. त्यांच्या आंदोलनाला मी पाठिंबा देईन आणि मी पण आंदोलनाला बसेन. कारण माझं गाव इथून फक्त दोन किमीवर आहे. तसंच मला असं कळतं आहे की पाच वर्गांना मिळून फक्त दोन शिक्षक आहेत. त्यातल्या एकाला एसआयरची ड्युटी लावली आहे. याला काय अर्थ आहे? तसंच सर तुमचा मुख्याध्यापक दारु पिऊन शाळेत येतो यावर वरिष्ठ अधिकारी काय करत आहेत? गावकऱ्यांच्या तक्रारीचं झालं काय? असा प्रश्न अभिजीत दिपकेंनी विचारला आहे

कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा

मुख्याध्यापकांवरील मद्यपानाचा आरोप आणि शिक्षकांची कमतरता या दोन्ही प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. जर मंगळवारपर्यंत संबंधित मुख्यध्यापकांवर कारवाई झाली नाही तर अभिजीत दिपके उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जर मुख्याध्यापकांवर कारवाई झाली नाही तर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button