
भाट्ये येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; कारही आदळली, २२ प्रवासी जखमी
रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथील झरी विनायक मंदिरा जवळील चढावावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका कारचा विचित्र अपघात झाला. रत्नागिरीहून पावसकडे जाणारी आणि पावसकडून रत्नागिरीकडे येणारी दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातानंतर पाठीमागून वेगाने येणारी कार अनियंत्रित होऊन एसटी बसवर आदळली.
या विचित्र तिहेरी अपघातात बसमधील तसेच कारमधील मिळून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले





