
’अंबरग्रीस’ बाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे आश्वासन
मागील काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याच्या कथित तस्करीबद्दल मच्छीमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कायद्यामधील बदल व इतर अनुषंगिक बदलासाठी खासदार नारायण राणे आणि विनोद तावडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मच्छीमार समाजाने घेतलेल्या भेटीप्रसंगी दिले.
अंबर ग्रीसचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वन, संशोधन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी एक अभ्यास गट स्थापन केला आहे. सदरच्या अभ्यासगटाबरोबर भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या मत्स्य संशोधक केंद्राचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या अभ्यास गटाला मार्गदर्शक म्हणून माजी आमदार डॉ. विनय नातू भूमिका पार पाडत आहे. तसेच प्रशासकीय आणि राजकीय पाठपुरावा याबाबत मदत करीत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच त्याच्या कथित तस्करीबद्दल मच्छीमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज गैरसमज आहेत. आजही व्हेल माशाच्या उलटीबाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग, तसेच तस्करी घडत असतात. स्पर्म संदर्भात गोष्टी घडत व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे बाधी उलटी अथवा शरीरातून ऊत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा को नसावा याबाबत तज्ज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत मतांतरे आहेत.
यासाठीच या अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली गेली आहे. संबंधित विषयात कायद्यामधील बदल करणार आहे, इतर अनुषंगिक बदलासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणा असे डॉ. नातू यांनी सांकितल, तसेच राज्याच वनमंत्री गणेश नाईक यांनही आवश्यक बाबीची माहिती दिल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले.




