तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! ‘या’ 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द


राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा हातोडा चालवला आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि त्याअंतर्गत ‘शेड्युल टी’ (Schedule T) मधील ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने एफडीएने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.राज्यभरातील 434 परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी मोहीम राबवून ही धडक कारवाई करण्यात आली. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली.एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील कारखाना परिसराची स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), चाचणी नोंदी (Testing Records), एसओपी (SOPs) आणि उत्पादनांचे लेबल्स यांसारख्या विविध निकषांची कसून छाननी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान नियम धाब्यावर बसवणाऱ्या 135 आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

FDA Cancelled License List : परवाने कायमस्वरूपी रद्द झालेल्या 10 संस्था

  1. मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे
  2. मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया
  3. मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  4. मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  5. मे. कालिदास गांधी – पुणे
  6. मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक
  7. मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
  8. मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती
  9. मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
  10. मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button