
मुंबईतील Blinkit च्या गोदामावर FDA ची मोठी कारवाई
मुंबईच्या मालाड येथील Blinkit च्या एका गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान, खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसह स्वच्छता आणि कीड नियंत्रणाशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर संबंधित सुविधेचा फूड लायसन्स निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती १० ऑगस्ट रोजी समोर आली.FDAच्या तपासणीदरम्यान गोदामातील खाद्यपदार्थांच्या साठवणुकीची परिस्थिती आणि स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, परिसरात मोठ्या प्रमाणात झुरळं आढळली, तर काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाणारे काही रॅक गंजलेले असल्याचेही निदर्शनास आले.याशिवाय काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोल्ड स्टोरेजमधील स्वच्छताही समाधानकारक नसल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले.
तपासणीतील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे गोदामात मुदत संपलेले तसेच पॅकेजिंगशी छेडछाड झाल्याचे आढळणारे खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.



