
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीची बैठक संपन्न.
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती ता. जि. रत्नागिरी या संस्थेची कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक ०८/०८/२०२६ रोजी दुपारी १२. ३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ( सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ) येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये खालील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्या धार्मिक संस्थेने जागेची परिपूर्ण प्रस्तावासह मागणी केली आहे त्या संस्थेला पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर पाठपुराव्याचे अधिकार देण्यात आले, या सर्व प्रक्रियेत संघर्ष समिती त्यांच्या सोबत असेल. जिल्हा प्रशासन यांच्या कडून आलेल्या पत्रव्यवहाराला तात्काळ उत्तर देणे. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून संबंधित खात्याच्या अधिकारी आणि मंत्री यांना खरी वस्तुस्थिती समजावून सांगणे. तालुक्यातील प्रत्येक गावा गावात थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीची संघर्षाची ज्योत प्रज्वलीत करणे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान श्री. एल. व्ही. पवार यांनी भूषविले. या बैठकीला कार्याध्यक्ष श्री. अनंत सावंत गुरुजी, उपाध्यक्ष श्री. प्रकाश यशवंत पवार, सचिव श्री. अमोल जाधव, उपसचिव श्री. रुपेश कांबळे,सल्लागार श्री. सुनिल आंबुलकर, श्री. शिवराम विठ्ठल कदम, श्री. दिपक सिताराम जाधव, श्री. प्रदिप भिकाजी पवार, श्री. दिवेन अनंत कांबळे, श्री. रत्नदीप कांबळे, श्री. केतन गणपत पवार, श्री. राहुल पवार, श्री. सुनिल पवार, श्री. अनंत पवार, श्री. राजन जाधव, श्री. राजेंद्र कांबळे, श्री. अजित जाधव,श्री. विजय मोहिते, आणि बहुसंख्य संघर्ष समितीचे कार्यकारिणी सभासद उपस्थित होते.




