
एकादशी कीर्तन सेवा उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळा
स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावस रत्नागिरी व रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेले एक वर्ष प्रत्येक एकादशीला एकादशी कीर्तन सेवा उपक्रम सुरु आहे. या कीर्तन सेवेची एक वर्षाची म्हणजे तपपूर्ती शनिवार दि. 8 ऑगस्ट आणि रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी अध्यात्म मंदिर, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी ह.भ.प. यश सोवनी पूर्वरंग रंगवणार आहेत तर ह.भ.प. अमृताताई नवाथे या उत्तररंग उलगडणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्री. महेशबुवा सरदेसाई पूर्वरंग रंगवणार आहेत तर ह.भ.प. प्रवीणबुवा मुळ्ये ज्यांच्या अथक प्रयत्नाने ही सेवा वर्षभर सुरु राहिली आहे आणि पुढेही राहणार आहे हे उत्तररंग रंगवणार आहेत.
नागरिकांनी या कीर्तनसेवेचा लाभ घ्यावा असे स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांचेतर्फे श्री. जयंतराव देसाई व श्री. ऋषिकेश पटवर्धन यांनी आवाहन केले आहे. याचबरोबर सर्व कीर्तनकारांनी या उपक्रमाला येऊन आपलीही सेवा रुजू होईल असे पहावे व या उपक्रमाला कृतीशील सहाय्य करावे असे आवाहन रत्नागिरी कीर्तनकार मंडळाने केले आहे.




