एका क्लिकवर सातबारा फेरफार


राज्यातील महसूल प्रशासनात महत्त्वाचा डिजिटल बदल करण्यात आला असून, अतिरिक्त महसूल आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी दिलेले आदेश आता थेट संबंधित तलाठ्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठविले जाणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे सातबारा उतार्‍यावरील फेरफार प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुलभ होणार असून, शेतकर्‍यांना कार्यालयांचे हेलपाटे मारण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी सातबारा उतार्‍याशी संबंधित फेरफार प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होत होती. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाची सत्यमत संबंधित पक्षकारांना मिळवून ती तलाठ्याकडे सादर करावी लागत होती. ही सत्यप्रत मिळविण्यासाठी
अनेकदा महसूल कार्यालयात वारवार जावे लागत असे. त्यामुळे फेरफार नोंदींना विलंब होत होता. तसेच, संबंधित पक्षकारांना नोटीस मिळाली नाही किंवा नोटीसच देण्यात आली नव्हती, अशा तक्रारीही वारंवार पुढे येत होत्या.
नवीन डिजिटल व्यवस्थेनुसार वरिष्ठ अधिकार्‍यांचा आदेश तयार होताच तो थेट ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित तलाठ्याकडे पोहोचणार आहे. त्याचबरोबर संबंधित पक्षकारांना देण्यात येणारी नोटीसही ऑनलाइन पाठविली जाणार असल्याने नोटीसबाबतचे वाद कमी होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button