
दापोलीच्या नाट्यगृहासाठी दिलेला शब्द एकनाथ शिंदेंनी पाळला
दापोलीला नाट्यगृहासाठी 15 कोटींचा निधी. शिवसेनेचे रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाला मोठे यश
दापोली
दापोली नगरपंचायतीत नगरपंचायत स्थापन झाल्यापासून गाडीतळावर असलेल्या जागेच्या ठिकाणी नाट्यगृह उभे राहावे यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केले होते. दापोलीच्या मंजूर विकास आराखड्यात नाट्यगृहासाठी आरक्षण ठेवण्यात आल होत.मात्र या सगळ्या प्रयत्नांना व मागणीला आता मूर्त रूप आल आहे. शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुरावाला यश आले असून नाट्यगृहासाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष कृपा घाग यांनी या विषयाची माहिती पत्रकारांजवळ बोलताना दिली आहे दिली आहे. रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी सायंकाळी मंजुरीचे पत्र नगरपंचायतीला प्राप्त झाल आहे. खेड येथील मीनाताई नाट्यगृहाच्या नूतनीकरण उद्घाटनाप्रसंगी रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली होती त्याला आता यश आल आहे. रामदास कदम यांच्या वाणीची दाखल घेत शिंदे यांनीही नाट्यगृहाला पंधरा कोटी रुपये देण्याचा शब्द दिला होता तो शब्द शिंदे यांनी पाळला आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे दापोली शहरात आता अध्यायवत आधुनिक सुविधा नियुक्त असं नाट्यगृह उभे राहणार आहे. शासनाच्या नगर विकास विभागाने २४ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
“नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, नाट्यगृह उभारणीच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राज्य शासन करणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी दापोली नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार असून, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
दापोली शहरातील गाडीतळ भागातील जुनी धर्मशाळा येथे हे व्यापारी संकुल व नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. दापोलीचे आमदार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या नाट्यगृहासाठी निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. या नाट्यगृहामुळे दापोली तालुक्यातील कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळेल नाट्य,कला सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राकरिता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दापोली शहर परिसर व तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून यामुळे नाट्य कला साहित्य क्षेत्रातील मंडळींकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातील मान्यवरांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.




